दाऊद इब्राहिमची कोंडी; कोण आहे सलीम फ्रूट?

 NIA कडून सलीम फ्रूट याला ताब्यात घेण्यात आलंय. सलीम फ्रूटकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे

Updated: May 9, 2022, 05:05 PM IST
दाऊद इब्राहिमची कोंडी; कोण आहे सलीम फ्रूट? title=

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने ( NIA) ने दाऊदशी संबंधित असणाऱ्या 20 ठिकाणांवर छापा घातला आहे. नागपाडा, मुंब्रा, भेंडीबाजार, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज अशा अनेक ठिकाणी  सकाळपासूनच NIA च्या टीमकडून धाडसत्र सुरु आहे.  हे सर्व छापे दाऊदसोबत संबंध असणाऱ्यांच्या ठिकाणी होत आहे. ही सर्व ठिकाणं दाऊचे शार्प शूटर, तस्कर, डी कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्यासोबत निगडीत आहेत. या कारवाईत NIA कडून सलीम फ्रूट याला ताब्यात घेण्यात आलंय. सलीम फ्रूटकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. याच सलीम फ्रूट आणि दाऊद इब्राहिमचे जवळचे संबंध असल्याचं समजत आहे. त्यामुळे दाऊदसंदर्भातली आणखी माहिती NIA च्या हाती लागण्याची मोठी शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच NIA दाऊदच्या साथीदारांचा मागावर असल्याचं दिसून आलंय.

कोण आहे सलीम फ्रूट?

सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे. PMLA ने याआधी सलीम फ्रूटचं स्टेटमेंट देखील नोंदवलं आहे. छोटा शकीलच्या पाकिस्तानच्या घरी सलीम तीन ते चार वेळा गेल्याची देखील माहिती आहे. 2006 मध्ये UAEमधून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आलीय. तो छोटा शकीलसाठी खंडणी वसूल करायचा 2006मध्ये त्याला अटक करण्यात आली होती . सलीम फ्रूटवर अनेक गुन्हे दाखल आहेत. इतकेच नव्हे तर सलीमवर मोक्का देखील लावण्यात आला होता. सलीम फ्रूट हा हसीना पारकरचा निकटवर्तीय होता. हसीना पारकर दाऊद इब्राहिमची बहीण होती. हसीना पारकरला सेटलमेंटच्या धंद्यात सलीम फ्रूटची मदत