प्रकाश मेहता आणि राध्येश्याम मोपलवारांच्या निलंबनासाठी विधीमंडळात गदारोळ

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांना आजच्या आज निलंबित करण्याची मागणी विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्णविखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.  

Updated: Aug 2, 2017, 01:37 PM IST
प्रकाश मेहता आणि राध्येश्याम मोपलवारांच्या निलंबनासाठी विधीमंडळात गदारोळ title=

मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांना आजच्या आज निलंबित करण्याची मागणी विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्णविखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.  

समृद्धी महामार्गेचे प्रमुख अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांचं वादग्रस्त फोन संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय. या संभाषणात मोलपलवर आणि बिल्डरचं साटंलोटं असल्याचं उघड होतंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची योजना भ्रष्ट अधिका-याच्या हातात गेलीय का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

पाहा व्हिडिओ