इथं अटल सेतू लाँच, तिथं रॉकेट बनला हा शेअर; 15 वर्षांचा रेकॉर्ड मोडत गाठला उच्चांक

Mumbai Trans Harbour Link Road : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केलं आहे. भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला अभियांत्रिकीचा चमत्कार म्हटलं जात आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून हा पूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Updated: Jan 12, 2024, 05:26 PM IST
इथं अटल सेतू लाँच, तिथं रॉकेट बनला हा शेअर; 15 वर्षांचा रेकॉर्ड मोडत गाठला उच्चांक title=

Mumbai Trans Harbour Link Road : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (MTHL) उद्घाटन करण्यात आलं आहे. अटल सेतू नावाने ओळखला जाणारा हा सागरी सेतू मुंबईच्या बांधकाम क्षेत्रासाठी एका परिवर्तनाच्या टप्प्याची सुरुवात आहे. भारतातील सर्वात लांब सागरी पूल हा समुद्रात 16.5km विस्तारासह 22 किमी लांबीचा असणार आहे. हा सागरी सेतू मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी करून केवळ 20 मिनिटांवर आणण्यासाठी तयार आहे. या सागरी सेतूमुळे मुंबईचा रिअल इस्टेट हब म्हणून मजबूत करणे, जागांच्या किमती वाढवणे आणि रिअल इस्टेट व्यवसायातच्या लक्षणीय वाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बल लिंक रोड मुंबईतील शिवडी येथून सुरु होतो आणि रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा येथे संपतो. हा पूल 18,000 कोटी रुपये खर्चून बांधला आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा एक स्वागतार्ह बदल आहे कारण तो पनवेल, शिवडी, नवी मुंबई आणि चेंबूर सारख्या ठिकाणांना जोडणाऱ्या रिअल इस्टेट मार्केटला नवी उंचीवर नेईल जे आतापर्यंत रिअल इस्टेट मार्केटमध्ये कमी महत्त्वाचे मानले जात होते. चेंबूर हा परिसर मुंबईतील काही प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा थेट लाभार्थी आहे. ईस्टर्न फ्रीवे, एससीएलआर आणि बीकेसी कनेक्टरमुळे वाढलेली कनेक्टिव्हिटी चेंबूर मायक्रो-मार्केट म्हणून बदलले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पातूनही असाच काहीसा फायदा होणार आहे.

शेअर बाजारातही तेजी

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आमि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतुच्या उद्घाटनादरम्यान मुंबईत कार्यरत असलेल्या रिअल-इस्टेट कंपन्यांच्या नफ्यामुळे शुक्रवारी निफ्टी रियल्टीने दोन टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेत 15 वर्षांमधील उच्चांकी पातळी गाठली आहे. दुसरीकडे, तज्ज्ञांच्या मते, नवीन पूल दोन शहरांमधील वाहतूक वेगवान होणार आहे. तसेच या पुलामुळे मध्य मुंबई आणि उपनगरात घरांच्या व्यवसायामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक गेम चेंजर ठरणार आहे. यामुळे आता प्राइम बिझनेस हबच्या जवळ व्यावसायिकांकडून घरांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सागरी सेतुच्या उद्घाटनादरम्यान, निफ्टी रियल्टी दिवसभरात 2.29 टक्के इतकी वाढून 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिडिने नॅशनल स्टॉक इक्सेंजवर आठ टक्क्यापेक्षा जास्त झेप घेतली. तर दुसरीकडे गोदरेज प्रॉपर्टीज लि. आणि ओबेरॉय रियल्टी लि. यांसारख्या मुंबईस्थित कंपन्यांन्यांच्या नफ्यात लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

बहुप्रतिक्षित ट्रान्स-हार्बर लिंकचे उद्घाटन रिअल इस्टेट विकासासाठी महत्त्वपूर्ण सकारात्मक आहे. आम्ही मागणीत वाढीची अपेक्षा करतो. या पुलामुळे ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे अॅनारॉक कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक शोभित अग्रवाल यांनी सांगितले. तर मुंबईचा पायाभूत सुविधांचा विकास, विशेषत: कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, संपूर्ण शहरामध्ये वेगाने होत आहे.किनारपट्टीचे रस्ते असोत, नवीन विमानतळ असोत, मेट्रो लाईन्स असोत, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड असोत किंवा भूमिगत कनेक्टिव्हिटी असोत, बरीच कामे बाकी आहेत. यापुढे रस्ते, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन कनेक्शन आणि उत्कृष्ट ड्रेनेज सिस्टम या सर्व गोष्टी रिअल इस्टेटच्या विकासासाठी आवश्यक आहेत, असे केअरएज रेटिंग्सच्या वरिष्ठ संचालक राजश्री मुरकुटे यांनी सांगितले.