...तर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी जनतेने पैसे उभारले असते- पृथ्वीराज चव्हाण

राज्य सरकार अनाकलनीय निर्णय घेत आहे.

Updated: Aug 13, 2018, 08:02 PM IST
...तर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी जनतेने पैसे उभारले असते- पृथ्वीराज चव्हाण title=

मुंबई: राज्यात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप करत बेकायदेशीर परवानग्यांना मुख्यमंत्री खतपाणी घालत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्य सरकार अनाकलनीय निर्णय घेत असून राज्यात रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाल्याचे त्यांनी म्हटले. 
 
 नोकऱ्या मिळत नसल्याचे नितीन गडकरींनी स्वतः कबुल केल्यामुळे सरकारने खुलासा करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मराठा आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. 
 
 काही हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची सरकारने कमी केली. हीच समस्या होती तर जनतेने पैसे दिले असते, असा टोलाही यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी हाणला.