राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची संपूर्ण मुलाखत

या मुलाखतीकडे संपूर्ण नेटीझन्स कान लावून बसले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2018, 02:37 PM IST

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रातील मंडळींनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, मात्र उद्धव ठाकरे यांनी आपण चोरूनही ही मुलाखत पाहिली नसल्याची शेरेबाजी या मुलाखतीवर केली आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची जी मुलाखत पुण्यात घेतली होती, त्याविषयी सर्वांना उत्सुकता होती, खास करून राज ठाकरे काय प्रश्न विचारतील याविषयी, या मुलाखतीत आपल्या मनातला प्रश्न पवारांना विचारला गेला किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी नेटीझन्स जास्त उत्सुक असतात.