रामदास आठवलेंची पत्नी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

आठवले साहेबांनी आदेश दिला तर मी निवडणूक लढवेन.

Updated: Sep 30, 2019, 03:37 PM IST
रामदास आठवलेंची पत्नी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक title=

मुंबई: 'रिपाई'चे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे कळते. त्यांना सांगलीच्या तासगावमधून निवडणूक लढवायची आहे. स्वत: सीमा आठवले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

मी तासगावमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आठवले साहेबांनाही बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता आठवले साहेबांनी आदेश दिला तर मी निवडणूक लढवेन, असे सीमा आठवले यांनी सांगितले. 

मात्र, शिवसेना-भाजप युतीचे सध्याचे जागावाटप पाहता तासगाव मतदारसंघ रिपाईच्या वाट्याला येण्याची शक्यता कमी आहे. 

सध्याच्या माहितीनुसार शिवसेना १२४ तर भाजप १४६ जागांवर लढणार आहे. रामदास आठवले यांनी जागावाटपापूर्वी रिपाईसाठी १० जागांची मागणी केली होती. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानेही अधिक जागांची मागणी धरली होती. परंतु, भाजप आणि शिवसेनेने मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे.