Viral Video : अंबानींच्या श्रीमंतीचं गुपित उघड? अनंत अंबानींचा व्हिडिओमुळे...

Anant Ambani Viral Video : आशियामधील सर्वात श्रीमंत आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांचं कुटुंब कायम चर्चेत असतं. अंबानीच्या श्रीमंतीचं गुपित एका व्हिडीओतून उघड झालं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2023, 12:29 PM IST
Viral Video : अंबानींच्या श्रीमंतीचं गुपित उघड? अनंत अंबानींचा व्हिडिओमुळे... title=
Reveal the secret of Ambanis wealth Anant Ambani Radhika Merchant Video viral on social media google trending now

Anant Ambani Radhika Merchant Video :  रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Reliance Head Mukesh Ambani) गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. त्यांनी  आपला सहकारी आणि लहानपणीचा मित्र मनोज मोदी (Manoj Modi) यांना तब्बल 1500 कोटींचं घर गिफ्ट म्हणून दिलं आहे. आशियामधील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, अदानी, टाटा, बिरला हे एवढे धनवान कसे? असा प्रश्न सर्वसामान्यांना कायम पडत असतो. त्यांचा श्रीमंत होण्याचं रहस्य कळलं तर आपणही तसं काही करु अशी त्यांची भावना असते. 

खरं तर प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा. आपणही आलिशान घरात राहवं, परदेशात फिरायला जावं, कुटुंबात सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असाव्यात. यासाठी अनेक जण नवस बोलतात, देवाला साकडं घालतात आणि ज्योतिष उपायही (astro news) करतात. अगदी आपलं बालिश मन अगदी साध्या गोष्टीवरही विश्वास ठेवतो. 

अंबानीच्या श्रीमंतीचं गुपित उघड? 

असो पण अंबानी कुटुंब एवढं श्रीमंत कसं यांचं गुपित उघड झालं आहे. ते झालं असं की, सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ त्यांचा साखरपुड्याचा आहे, असं वाटतं. अनंत आणि राधिका एकत्र उभी असतात आणि गप्पा मारत असतात. तेव्हा अनंत यांच्या पापणीचा केस गालावर पडतो. राधिका ते पाहते आणि तो केस अनंत यांच्या हातावर देते.  मग अनंत अंबानी त्यावर फुंकर मारतात. (Reveal the secret of Ambanis wealth Anant Ambani Radhika Merchant Video viral on social media google trending now)

अशी समज आहे, की पापणीचा केस असा हातावर घेऊन तुम्ही देवाकडे इच्छा बोलून दाखवली की ती पूर्ण होते. खरं तर ही गोष्ट तुम्ही आम्ही प्रत्येकाने कधी ना कधी केलेली असते. अनंत आणि राधिका यांच्यामधील या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यांच्यामधील प्रेम हे सर्वसामान्य प्रेमी युगुलांच्या प्रेमासारखंच जाणवतं. 

ही एक अंधश्रद्धा असली तरी हा प्रयोग करायला अनेकांना आवडतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अंबानी यांचं श्रीमंत होण्याचं गुपित समोर आलं या कॅप्शन खाली व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर justsurajokes या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळतं आहे.