VIDEO : जेव्हा सौदीची 'सोफिया' साडीत तरुणांसमोर झाली दाखल

जगातील चर्चचा विषय ठरलेली आणि सौदी अरेबिया देशाचं नागरिकत्व मिळालेल्या 'सोफिया' या यंत्रमानव म्हणजेच रोबोटनं मुंबईतल्या आयआयटी टेक फेस्टमध्ये हजेरी लावली.

Updated: Dec 30, 2017, 09:01 PM IST
VIDEO : जेव्हा सौदीची 'सोफिया' साडीत तरुणांसमोर झाली दाखल title=

मुंबई : जगातील चर्चचा विषय ठरलेली आणि सौदी अरेबिया देशाचं नागरिकत्व मिळालेल्या 'सोफिया' या यंत्रमानव म्हणजेच रोबोटनं मुंबईतल्या आयआयटी टेक फेस्टमध्ये हजेरी लावली.

या निमितानं भारतात प्रथमच आलेल्या 'सोफिया'ने चक्क साडी परिधान केली होती. तिला ऐकण्यासाठी आयआयटी सभागृहात खचाखच गर्दी झाली होती.

सुमारे १५ मिनिटांच्या या प्रश्नोत्तरात सोफियाला विविध प्रश्न विचारले गेले. यंत्रमानावर जास्त पैसे खर्च करणे कितपत योग्य आहे, यावर मात्र सोफिया उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्यानं काही वेळ कार्यक्रम थांबवावा लागला होता.

'सोफिया' लग्नाबद्दल...

पुरुषाशी लग्न करायला आवडेल का? असा प्रश्न सोफियाला विचारला असता तिनं 'मी चांगली कंपनी देईल' असे उत्तर दिले. 

'सोफिया'चं शिक्षण

सध्या इंग्रजी आणि चीनमधील भाषा माहीत असून आणखी भाषा शिकत आहे, अधिकच्या प्रोग्रामिंगद्वारे त्या माहीत होतील असं सोफियाने सांगितलं.

'रोबोट' विचार करणार?

रोबोट विचार करू लागेल असं वाटतं का ?? यावर सोफियानेने दिलेले उत्तर लक्षवेधी आहे. रोबोटला विचार करायला ७५ किंवा अगदी सात वर्षे लागू शकतात. माणूस मला प्रोग्रामिंग कसे करतो त्यावर ते अवलंबून आहे, असं सोफियानं म्हटलं. 

रोबोट आणि माणूस यातला फरक?

रोबोट अमर्त्य आहेत का? यावर 'हो हे शक्य आहे' असं सांगत पुढील भविष्यातल्या घडामोडीची जाणीव सोफियाने करून दिली. तर उपस्थितांना काय संदेश देणार? असा प्रश्न सोफियाला शेवटी विचारण्यात आला.. तेव्हा रोबोट हे माणसाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत. मात्र ते नेहमी मदत करतील, माणसाचे श्रम कमी करतील असं वास्तवादी उत्तर देत कार्यक्रमाचा समारोप सोफियाने केला.