रॉयल इनफिल्ड थंडरबर्ड 350 सीसी ३५ हजारात, तर मारूती बलेनो फक्त ६० हजारात

बुलेट कुणाला आवडत नाही, आणि तुम्ही रॉयस इनफिल़्डचे फॅन असाल तर आणखी सांगायलायच नको. 

Updated: Nov 13, 2018, 02:03 PM IST
रॉयल इनफिल्ड थंडरबर्ड 350 सीसी ३५ हजारात, तर मारूती बलेनो फक्त ६० हजारात title=

मुंबई : बुलेट कुणाला आवडत नाही, आणि तुम्ही रॉयस इनफिल़्डचे फॅन असाल तर आणखी सांगायलायच नको. बाजारात आघाडीवर असलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत तुम्हाला रॉयल इनफिल्ड थंडरबोल्ड 350 फक्त ३५ हजारात मिळत असेल तर. या बाईकची बाजारात किंमत आहे रूपये १ लाख ५७ हजार. ही बुलेट ३५ हजारात मिळाली तर...

droom.in वर वापरलेल्या बुलेट आणि बड्या कंपनीच्या कार स्वस्तात मिळतायत. १ लाख ५७ हजाराची रॉयल इनफिल्ड थंडरबोल्ड 350 सीसी फक्त ३५ हजारात मिळतेय, हे मॉडेल २००३ चं आहे. ही 'सेकन्ड हॅण्ड' वाहनं असली, तरी लोकांनी याला मोठ्या प्रमाणात पसंती देण्यास सुरूवात केली आहे.

याचप्रमाणे २००४चं मॉडेल मारूती बलेनो देखील ६० हजार रूपयात उपलब्ध आहे. ही कार फक्त शहरात वापरल्याचा दावा आहे, तसेच या कारचा कोणताही अपघात किंवा ओरखडे नसल्याचंही यात म्हटलं आहे. droom.in वर ही माहिती लिहिली आहे. नव्या मारूती बलेनोची ऑनरोड किंमत ही ८ लाख ३४ हजार रूपये आहे.

वापरलेल्या खूप साऱ्या कार ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या कारच्या किंमती या १ लाखापेक्षा कमी आहेत, हे विशेष. फोर्ड आयकॉन ४० हजारात वापलेली टाटा नॅनो, मारूती ८००, मारूती झेन, मारूती वॅगन आर, टाटा इंडिका, हुंदाई गेट्झ आणि मारूती इस्टीम, ३० हजारापासून ते ७० हजार, ते ९० हजारापर्यंत उपलब्ध आहेत, वापरलेली होंडा सिटी ९० हजारात आहे.