अंधेरी दुर्घटनाग्रस्तांना श्रद्धांजली देण्याची कॉंग्रेस नेत्याला घाई

सुदैवाने यामध्ये कोणती जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. 

Updated: Jul 3, 2018, 04:35 PM IST
अंधेरी दुर्घटनाग्रस्तांना श्रद्धांजली देण्याची कॉंग्रेस नेत्याला घाई  title=

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनवरचा पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणती जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. पण कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी हे समजून घेण्याआधीच सकाळी श्रद्धांजली देण्याची घाई केली आहे. यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. अंधेरी स्टेशनवरचा पादचारी पूल कोसळल्यानंतर लगेचच मुबंई अध्यक्ष संजय निरूपम यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.  दुर्घटनेत पाच जण जखमी झालेत. जखमींना जवळच्याच कुपर रुग्णालयात हलवण्यात आलंय.  यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे... तर तीन जणांना फ्रॅक्चर झालंय. एकूण चार पुरुष आणि एक महिला यात जखमी झाले आहेत... द्वारकाप्रसाद शर्मा, मनोज मेहता, हरिश कोहाटे, गिंधम सिंघ अशी जखमी झालेल्या पुरुषांची नावं आहेत... तर एक महिला जखमी आहे.

काय म्हणाले निरूपम ?

'एलफिस्टन रेल्वे ब्रीज दुर्घटनेत लोकांचे प्राण गेले. आतापर्यंत मला नाही माहीत किती लोकांचा मृत्यू झालाय पण एलफिस्टन दुर्घनेतून रेल्वे प्रशासन काही शिकले नाही. आमचे रेल्वेमंत्री मोठमोठ्या बाता करतात. एवढा प्रेशर असूनपण पूल, प्लॅटफॉर्म, रेल्वेट्रॅक यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे अशी घटना होते.. ईश्वर,जर कोणाचा या दुर्घटनेत मृत्यू झालायं त्याच्या परिवारास ताकद देवो..' असे निरूपम यांनी म्हटले. रेल्वे मंत्री कधी आर्मीला घेऊन येतात, कधी बुलेट ट्रेनच्या वार्ता करतात त्यांना मी एवढंच सांगेन लोकल ही मुंबईकरांचा प्राण आणि आयुष्य आहे..त्यांची मोठमोठ्या गोष्टी सांगून दिशाभूल करू नका असेही त्यांनी म्हटलेय.

जखमी कुपर रुग्णालयात 

जखमींना जवळच्याच कुपर रुग्णालयात हलवण्यात आलंय.  यात २ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे... तर तीन जणांना फ्रॅक्चर झालंय.