Shantanu Naidu एवढ्या कमी वयात Ratan Tata यांच्या खांद्यावर हात ठेवण्या इतका जवळचा कसा झाला? जाणून घ्या मागचं सत्य

शंतनू नायडू असा आला रतन टाटा यांच्या जवळ 

Updated: Jan 20, 2022, 09:59 AM IST
Shantanu Naidu एवढ्या कमी वयात Ratan Tata यांच्या खांद्यावर हात ठेवण्या इतका जवळचा कसा झाला? जाणून घ्या मागचं सत्य  title=

मुंबई : रतन नवल टाटा (Ratan Naval Tata) एक लोकप्रिय व्यक्ती. ज्यांना परिचयाची काही आवश्यकता नाही. भारतात एकही व्यक्ती असा नसेल ज्याला रतन टाटा यांच नाव माहित नाही. श्रीमंत कुटुंबातील रतन टाटा कायमच सामान्यांना देखील आपले वाटले. ते म्हणजे त्यांच्या गुणांमुळे. 

हल्लीच रतन टाटा यांच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक विशीतला तरूण त्यांच्यासोबत दिसला. ज्याने एकट्याने रतन टाटा यांचा वाढदिवस साजरा केला. 

ही चर्चा एवढ्यावरच थांबली नाही तर त्याने चक्क रतन टाटा यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. ज्याबद्दल साऱ्यांनाच कुतूहल वाटलं. दस्तुरखुद्द रतन टाटा यांच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती म्हणजे नक्कीच त्यांच्या जवळच्यांपैकी एक असेल. 

रतन टाटा यांच्यासोबत आधी देखील या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा मुलगा नेमका कोण? रतन टाटा यांच्यापर्यंत तो कसा पोहोचला? असं या मुलामध्ये काय वेगळं आहे ज्यामुळे त्याची एवढी चर्चा होतेय? तर आपण आज हे सारं पाहणार आहोत. (अवघ्या २ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतात रतन टाटांचे भाऊ? का जगतात असं आयुष्य) 

कोण आहे शंतनु नायडू?

वयाच्या 28 व्या वर्षी शंतनू नायडू याने व्यवसाय उद्योगात वेगळे स्थान मिळवले. जे अनेकांसाठी नेहमीच एक स्वप्न राहिले आहे. रिपोर्ट्सनुसार, शंतनु नायडू रतन टाटा यांना स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बिझनेस टिप्स देतात. 

शंतनू नायडूचा जन्म 1993 मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाला. तो एक प्रसिद्ध भारतीय उद्योगपती, अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, DGM, सोशल मीडिया प्रभावकार, लेखक आणि उद्योजक आहे. टाटा ट्रस्टचे डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून शंतनू नायडू हा देशभरात खूप लोकप्रिय आहेत.

कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए झालेला शंतनू नायडू हा टाटा समूहात काम करणारा त्यांच्या कुटुंबातील पाचवी पिढी आहेत. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, शंतनू जून 2017 पासून टाटा ट्रस्टमध्ये काम करत आहे. याशिवाय नायडू यांने टाटा ऍलेक्सीमध्ये डिझाईन अभियंता म्हणूनही काम केले आहे.

रतन टाटा यांच्यासोबत असं सुरू केलं काम?

तरुण माणूस शंतनू नायडू यांचे स्वप्न सत्यात उतरले जेव्हा रतन टाटा यांनी त्याच्या फेसबुक पोस्टनंतर त्याला मीटिंगसाठी आमंत्रित केले. जेथे त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टरसह कुत्र्यांच्या कॉलरबद्दल लिहिले जेणेकरुन ड्रायव्हर्स त्यांचा वापर करू शकतील. तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर पाहता येईल. शंतनू नायडू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, 'ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आमचे काम टाटा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले.

विद्यार्थी संघटना असल्याने शंतनूकडे हे कॉलर बनवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. म्हणून, त्याने कॉलर बनवण्यासाठी डेनिम पँटचा बेस मटेरियल म्हणून वापर करण्याचे ठरवले. त्याने वेगवेगळ्या घरातून डेनिम पँट्स गोळा केल्या. यानंतर पुण्यात ५०० रिफ्लेक्टिव्ह कॉलर बनवण्यात आले आणि ५०० कुत्र्यांनी कॉलर घातल्या.

 

रतन टाटा यांच्याजवळ असा आला शंतनू

त्यांनी बनवलेले हे कॉलर घातल्याने रात्रीच्या वेळी पथदिवे नसतानाही वाहनचालकांना दूरवरून कुत्रे दिसत होते आणि त्यामुळे रस्त्यावरील कुत्र्यांचा जीव वाचू शकतो. अनेकांनी त्यांचे काम पाहिले आणि खूप कौतुक केले. शंतनू नायडू यांच्या कार्याकडे लवकरच व्यापक लक्ष वेधले गेले आणि टाटा कंपनीच्या वृत्तपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाले, ज्यांना टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्राणी कार्यकर्ते रतन टाटा यांच्याकडून स्वतः मुंबईला आमंत्रण मिळाले.

2016 मध्ये, शंतनू नायडू एमबीए करण्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात गेले. जेव्हा त्यांनी पदवी पूर्ण केली आणि 2018 मध्ये परत आले तेव्हा ते टाटा ट्रस्टमध्ये चेअरमन ऑफिसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रुजू झाले.