Share Market : 16, 17 मार्चला मोठ्या कमाईची संधी, या दोन कंपन्यांचे IPO बाजारात

Share Market : ​बाजारात दोन मोठ्या कंपन्याचे आयपीओ येणार आहेत. त्यामुळे 16 आणि 17 मार्चला चांगली कमाई करण्याची संधी मिळणार आहे. 

Updated: Mar 14, 2021, 10:38 AM IST
Share Market : 16, 17 मार्चला मोठ्या कमाईची संधी, या दोन कंपन्यांचे IPO बाजारात  title=
संग्रहित छाया

मुंबई : Share Market : बाजारात दोन मोठ्या कंपन्याचे आयपीओ (IPO) येणार आहेत. त्यामुळे 16 आणि 17 मार्चला चांगली कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कल्याण ज्वलर्स ( Kalyan Jewellers IPO) आणि राकेश झुनझुनवाला ( Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. हे आयपीओ खरेदी करुन तुम्ही भविष्यात मोठी कमाई करु शकता.

शेअर बाजाराचा बिग बुल राकेश झुंझुनवाला यांच्या सारखी चांगली कमाई करु शकता. त्यासाठी तुम्हाला आधी काही शेअर खरेदी करावे लागतील. तसेच शेअर मार्केटमध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगले पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होईल. आता कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ ( Kalyan Jewellers IPO) बाजारात येत आहे. याचे मूल्य 86-87 रुपये प्रति शेअर असण्याची शक्यता आहे. दरम्यान, 1175 कोटी रुपयांचा IPO 16 मार्चला बाजारात ओपन होणार आहे. तर राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीचा IPO बाजारात येणार आहे. 17 मार्च रोजी हा आयपीओ तुम्ही खरेदी करू शकता.  

त्यामुळे शेअर बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परतावा देणाऱ्या कंपन्यात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आता दोन कंपन्यांचे आयपीओ शेअर  बाजारात मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे. राकेश झुनझुनवाला यांचा Nazara Technologies Ltd's  या IT कंपनीचा आयपीओ ( Initial Public Offer : IPO) बाजारात येणार आहे. 17 मार्च रोजी हा आयपीओ तुम्ही खरेदी करू शकता. या आयपीओची किंमत 1100 ते 1101 रुपये इतका असण्याची शक्यता आहे.

Kalyan Jewellers IPO तीन दिवस सुरू आहे आणि एंकर गुंतवणूकदारांसाठी 15 मार्च रोजी खुला होणार आहे. आयपीओच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांपर्यंत नवी इक्विटी समाविष्ट आहे. 375 कोटी रुपयांचे शेअर विक्रीसाठी प्रस्तावित आहे. आयपीओच्या अंतर्गत विक्री प्रस्तावांमध्ये कल्याण ज्वेलर्सचे प्रवर्तक टी.एस.कल्यारमन आपल्या भागधारकांच्या 125 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करतील. वारबर्ग पिंकसची सहयोगी कंपनी हायडेल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड विक्री प्रस्तावाच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करेल. कल्याण ज्वेलर्सचे देशात आणि केंद्र शासित प्रदेशात 107 शोरूम असून पश्चिम आशियात 30 शोरुम आहेत.

तर राकेश झुनझुनवाला यांची Titan Company मध्येही मोठी भागिदारी आहे. Titan कंपनीत 5.32 टक्के म्हणजेच 6850 कोटींची भागिदारी आहे. तज्ज्ञांच्या मते टायटनच्या शेअरची किंमत येत्या काही दिवसात 1650 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या या शेअरची किंमत 1400 रुपयांच्या जवळापास आहे. कारण सध्या सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरते. टायटन देशातील अग्रणी ज्वेलरी ब्रॅन्ड आहे.