Election Results | शेंदुर्णी, नेर, रिसोड, ब्रह्मपुरी, लोहा, मौदा नगपरिषदेचा निकाल

पाहा सर्व नगपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल

Updated: Dec 10, 2018, 01:13 PM IST
Election Results | शेंदुर्णी, नेर, रिसोड, ब्रह्मपुरी, लोहा, मौदा नगपरिषदेचा निकाल title=

मुंबई : राज्यात धुळे, अहमदनगर महापालिकेसह काही ठिकाणी नगरपरिषदेच्या निवडणुका देखील आज पार पडल्या, यात थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले गेले. यात ३ ठिकाणी भाजपला यश आलं आहे, एका ठिकाणी काँग्रेसला, तर नेरमध्ये शिवसेनेला यश आलं आहे. रिसोडचं नगराध्यक्षपद जनआघाडीकडे गेलं आहे. खालील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नगपरिषदेवर कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला यात नगराध्यक्षपदी स्थान मिळालेलं नाही.

जळगाव | शेंदुर्णीच्या नगराध्यक्षपदी, भाजपाच्या विजया खडसे 
यवतमाळ | नेरच्या नगराध्यक्षपदी, शिवसेनेच्या सुनीता जैस्वाल
वाशिम | रिसोड नगरपरिषदेचं नगराध्यक्षपद जनआघाडीकडे 
चंद्रपूर | ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उरांडे
नांदेड | लोहा नगराध्यक्षपदी, भाजपचे गजाजन सूर्यवंशी
नागपूर | मौदा नगराध्यक्षपदी, भाजपच्या भारती सोमनाथे