मोदी, शहा, फडणवीस जिंकले तुम्ही, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची टीका

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यावर शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Updated: Oct 8, 2022, 11:05 PM IST
मोदी, शहा, फडणवीस जिंकले तुम्ही, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची टीका title=
Sushma andhare on shivsena symbol

मुंबई : निवडणूक आयोगाने (EC) धनुष्यबाण (Bow and Arrow) हे चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीआधी (Andheri by-election) निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण देखील वापरता येणार नाहीये. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केलीये. (Sushma andhare dig on BJP)

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, 'नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी जिंकले तुम्ही. तुमचं राजकारण जिंकलंय. शिंदे जिंकले नाहीत. ते फक्त हे टूल आहे. अंधार वाढत चाललाय. पण आम्ही उजेडासाठी लढत राहू. शेवटच्या श्वासपर्यंत लढत राहू. खडकावरही उगवून येऊ. या सगळ्यांच्या मागे भारतीय जनता पार्टीच आहे.'

ठाकरे गटाच्या अडचणी आता वाढणार आहेत. कारण नव्या नावासह आणि चिन्हासह ही निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्याचं मोठं आव्हान ठाकरे गटासमोर आहे. तर दुसरीकडे शिंदे गट निवडणूक लढवणार नसल्यामुळे याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. शिवसेनेला धनुष्य बाण चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच धनुष्यबाणाविना निवडणूक लढवावी लागणार आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी ही या निर्णयावर टीका केली आहे. 'निवडणूक आयोग ही संस्था वेठबिगार झाली आहे. आम्ही तक्रार दिली त्याच काहीच नाही. कोणी तक्रार दिली त्यावर हे काम करत आहेत. असा निर्णय देशाच्या संविधानावर घाव घालणार आहे.' असं त्यांनी म्हटलं आहे.