राज्यात दुकाने, हॉटेल २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा

राज्यात आता नोंदणीकृत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता आठवड्याचे सातही दिवस २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

Updated: Aug 11, 2017, 08:05 AM IST
राज्यात दुकाने, हॉटेल २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा title=

मुंबई : राज्यात आता नोंदणीकृत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आता आठवड्याचे सातही दिवस २४ तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

विधानसभेनं रात्री उशिरा महाराष्ट्र आस्थापना कायद्यातल्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली.  नव्या सुधारणांनुसार महाराष्ट्रातली आस्थापनांचे दोन प्रकारात विभाजन करण्यात येईल. १० पेक्षा कमी कर्मचारी असणारी अस्थापने आणि १० पेक्षा जास्त कर्मचारी अस्थापने असे हे दोन प्रकार आहेत. 

१० पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या अस्थापनांना स्वतःहून स्थानिक नियामकाच्या कार्यालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करून कायद्यातल्या नव्या तरतूदीचा फायदा घेता येईल. पण ज्या अस्थापनांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यांचे परवान्यांची योग्य ती छाननी करून मगच त्यांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे.  

आता हे विधेयक विधानपरिषदेच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. पण सत्ताधारी पक्षा भाजप-सेना युतीला या सभागृहात बहुमत नाही. त्यामुळे विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यास आणखी काही अवधी लागू शकतो.