वहिनी असावी तर अशी...या व्हिडिओमागील व्हायरल सत्य

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षितच्या लो चली मैं... या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका वहिनीचा हा व्हिडिओ. या व्हिडिओत एक वहिनी आपल्या दिराच्या आणि नववधु जावेची वरात आनंदाने साजरी करत आहे. या व्हिडिओमागील व्हायरल सत्य आता समोर आलं आहे. हा व्हिडिओ कुणाचा आणि कुठला आहे हे आता कळलं आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 26, 2018, 05:11 PM IST
वहिनी असावी तर अशी...या व्हिडिओमागील व्हायरल सत्य  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षितच्या लो चली मैं... या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका वहिनीचा हा व्हिडिओ. या व्हिडिओत एक वहिनी आपल्या दिराच्या आणि नववधु जावेची वरात आनंदाने साजरी करत आहे. या व्हिडिओमागील व्हायरल सत्य आता समोर आलं आहे. हा व्हिडिओ कुणाचा आणि कुठला आहे हे आता कळलं आहे. 

या व्हिडिओतील ती वहिनी म्हणजे सखी ऋषिकेश थरवळ. सखीच्या सख्या दिराचा समीरचा विवाह सोहळा होता. समीर आणि मीराच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावात हे लग्न 19 मार्च रोजी झालं. आणि या लग्नात नववधु आणि नववराच्या स्वागताच्या वेळी सखी थरवळने हा डान्स केला. ''हम आपके है कोन'' या सिनेमातील रेणुका शहाणे यांच्या गाण्यावर हा डान्स केला आहे.

काय म्हणाल्या रेणुका शहाणे 

तसेच सखी थरवळ ही मीडियाशी संबंधीतच आहे. रिपोर्टर म्हणून कार्यरत होती सखी. सखीचा नवरा ऋषिकेश थरवळ देखील पत्रकारितेशी संबंधीत आहे. सखीचा हा व्हिडिओ तिला जास्त आनंद देणारा आहे. तसेच रेणुका शहाणेने हा व्हिडिओ पाहिलायवर तिने सखीला शब्बासकी दिली आहे. सखीप्रमाणेच इतर वहिन्यांनी देखील आपल्या दिराचं आणि नववधु जावेचं स्वागत असं करावं असा निरोप दिला आहे.  

 

या व्हिडिओने सोशल मीडियावर खूप पसंती मिळवली आहे. आता लग्नात अनेक जण डान्स करतात. किंवा खास संगीतचा कार्यक्रम ठेवून नाच गाण्याचा कार्यक्रम होतो. पण अशा पद्धतीने व्हायरल होणार हा पहिलाच व्हिडिओ आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा नाते संबंध आता आणखी जवळ येत असल्याच स्पष्ट झालं आहे.