एसटी संपकाळात शासनाकडून पर्यायी व्यवस्था....

  १७ तारखेपासून एसटीच्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने पुढील उपाययोजना केल्या आहेत.

Updated: Oct 20, 2017, 08:20 PM IST
एसटी संपकाळात शासनाकडून पर्यायी व्यवस्था.... title=

मुंबई :  १७ तारखेपासून एसटीच्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने पुढील उपाययोजना केल्या आहेत.

- संपाच्या पहिल्या दिवसापासून खासगी बसेस, शालेय आणि कंपनीच्या बसेस तसेच इतर खासगी वाहन धारकांना एसटीच्या बसस्थानकांवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली.

- त्यानुसार पहिल्या दिवसापासून सुमारे 4 हजार खासगी वाहने प्रवासी वाहतूक करीत आहेत. 

- जिथे-जिथे संपकर्त्यांकडून या खाजगी वाहनांना विरोध झाला. तेथे बसस्थानकाच्या बाहेरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. यामध्ये शासनाच्या परिवहन विभाग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाची मदत घेतली जात आहे. याबरोबरच बेस्ट, नवी मुंबई महापालिका परिवहन यासारख्या स्थानिक वाहतूक संस्थांची मदत घेण्यात आली.

- रेल्वे प्रशासनाला विनंती करून त्यांच्या नियमीत मेल एक्सप्रेसना जादा कोचेस लावण्यास सांगितले गेले.

- 18 आणि 19 आक्टोबरला मुंबई-कोल्हापूर मार्गावर महालक्ष्मी एक्सप्रेस, कोल्हापूर-पुणे- गोंदिया मार्गावर महाराष्ट्र एक्सप्रेसला जादा कोचेस लावण्यात आले.

- 21,22 आक्टोबरला होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने नांदेड- मुंबई मार्गावर व परतीच्या मार्गावर जादा गाडया सोडण्याचे नियोजन केले आहे.

-  गृह विभागाला विनंती करून प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या होमगार्ड ना दैनंदिन भत्ता देऊन एसटी बसेस चालवण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

- मुंबई मेरीटाईम बोडॆच्या मदतीने भाऊचा धक्का ते दाभोळ व दिघी या मार्गावर फेरी बोटी सुरू करण्यात आल्या आहेत.

- 18 ऑक्टोबरला संपावर गेलेल्या मान्यताप्राप्त कामगार संघटनेला चर्चेसाठी बोलावण्यात आले. त्या दिवशी सकाळी 10 वाजल्या पासून रात्री 1 पर्यंत सुरूवातीला एसटी प्रशासन व नंतर मा. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांचेसोबत 13-14 बैठक झाल्या. यावेळी राज्य परिवहन कमॆचार्याना सन.2016-2020 या करारापोटी सुमारे रू. 4400 कोटी पयॆंतचे चांगले पँकेजचा प्रस्ताव ठेवला. पण सदर संघटनेने प्रस्ताव नाकारून संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.

प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा या उद्देशाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.