'तारक मेहता का उल्टा चष्मा'चं काय होणार

स्वत:चं वेगळेपण जपणारी टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Updated: Sep 17, 2017, 09:20 PM IST
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चं काय होणार title=

मुंबई : स्वत:चं वेगळेपण जपणारी टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आजही ही मालिका आणि जुने एपिसोड आवडीने पाहिले जातात. लोकप्रिय असणारी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे.

कारण 'शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ (SGPC) ने ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. मालिकेत काही आक्षेपार्ह आणि निंदाजक दृश्ये असल्यामुळेच या मालिकेवर तात्काळ बंदीची मागणी आहे.

'एसजीपीसी'चे प्रमुख कृपालसिंग बादुंगर यांनी माध्यमांना उद्देशून जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, शिखांचे दहावे धर्मगुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या जिवंत स्वरुपाचं चित्रण केल्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत आणि असं करणं शीख समुदायात आखून देण्यात आलेल्या नियमांविरोधात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

'कोणताच अभिनेता किंवा कोणत्याही भूमिकेतून कोणीही स्वत:ला शिखांच्या दहाव्या धर्मगुरुंच्या म्हणजेच गुरु गोविंद सिंग यांच्या बरोबरीचं स्थान देऊ शकत नाही. कारण हा अक्षम्य गुन्हा आहे', असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.