जन्मदात्या आईची मुलाकडून स्क्रू ड्रायव्हर खुपसून निर्घुण हत्या, मुलाला अटक

वाद इतका विकोपाला गेला की मुलगाच बनला खूनी 

Updated: Jul 20, 2021, 12:44 PM IST
जन्मदात्या आईची मुलाकडून स्क्रू ड्रायव्हर खुपसून निर्घुण हत्या, मुलाला अटक   title=

मुंबई : ठाण्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. जन्मदात्या आईवरच मुलाने स्क्रू ड्रायव्हरने वार केलेत. पैसे देण्याच्या वादावरून मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने आपल्या सख्ख्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैसे देण्यावरुन झालेल्या वादातून मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे.(Thane Mumbra son killed mother by Screwdriver in Chest, Arrested )  मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने टोकाचे पाऊल उचलले. आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून त्यांची निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी घडली आहे. ही घटना मुंब्य्रातील रेतीबंदर परिसरात एकच खळबळ उडाली. विशाल एलझेंडे हा अविवाहित युवक मुंब्रा येथे आपली आई उर्मिला एलझेंडे हिच्यासोबत राहत होता. विशाल जी काही कमाई करायचा, त्या पैशांची उधळपट्टी करायचा. त्यानंतर आईकडे सतत पैशांची मागणी करत राहायचा. त्यामुळे मायलेकात कायम खटके उडत असत. या वादाने सोमवारी रौद्र रूप धारण केलं. 

सोमवारी दुपारी देखील पैशांवरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर राग अनावर झाल्याने विशालने जवळच पडलेला स्क्रू ड्रायव्हर आईच्या छातीत खुपसला. विशालने केलेला वार एवढा गंभीर होता की आईचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी विशालला अटक केली. मयत उर्मिला एलझेंडे हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.