कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणा-या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून नऊ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

Updated: Sep 20, 2017, 12:48 PM IST
कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले title=

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणा-या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून नऊ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

अवघ्या तासात पायथा वीज गृह सुरू होणार आहे. त्यातूनही कोयना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात २.१७ टीएमसीने वाढ झाली आहे. आत्ता कोयना धरणात १०४.१७ टीएमसी पाणी साठा आहे. कोयना जलाशयाची सप्टेंबर मधील निर्धारीत जलपातळी १०३ टीएमसी आहे. ती गाठल्याने आज सकाळी धरणाचे सहाही वक्र दरवाजे उघडण्यात आले.