... तर ते 4 दिवसांत राज्य विकतील, अजित पवारांवर केली या आमदाराने टीका

भाजप आमदाराची विधान परिषेदत टीका 

Updated: Dec 22, 2021, 06:32 PM IST
... तर ते 4 दिवसांत राज्य विकतील, अजित पवारांवर केली या आमदाराने टीका title=

मुंबई : भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सकाळी मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार नसतील तर त्यांनी रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा अशी खोचक टीका केली होती. याचाच संदर्भ घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. निमित्त होते राज्यात झालेल्या परीक्षा घोटाळ्याचे. यावेळी बोलताना पडळकर यांनी राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? असा सवालही केला.

परीक्षा घोटाळ्याचे प्रत्येक ठिकाणाहून लाखोंचे आकडे बाहेर येत आहेत. हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय, असा आरोपही त्यांनी केला.

या घोटाळ्यात तुमचेच एवढी लोक सामील असतील, तर पोलीस चौकशी कशी करणार. तुम्ही काही केलं नाही, तर भीती कसली. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या बोलण्याच्या ओघात आमदार पडळकर यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला, तर ते अधिवेशन संपायच्या आत ४ दिवसात राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका केली.