मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा कॉल, मुंबई पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Eknath Shinde Death Threat Call : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी त्याचा शोध घेत कॉल करणा-याला ताब्यात घेतलाय.  डायल 112 ला हा फोन आला होता. 

Updated: Apr 11, 2023, 12:35 PM IST
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा कॉल, मुंबई पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात title=

CM Eknath Shinde Death Threat: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा कॉल आलाय. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असं बोलून हा कॉल कट झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत कॉल करणा-याला ताब्यात घेतलाय. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. डायल 112 ला हा फोन आला होता. पोलिसांनी शोध सुरू केला असता पुण्यातील वारजे इथलं हे कॉल लोकेशन असल्याचं उघड झालं. कॉल करणारा धारावीत राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

फोन कॉलद्वारे धमकी देणारा युवक

दरम्यान, मुख्यमंत्री  शिंदे यांना उडून टाकण्याची धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आले. यावेळी त्याने आपण दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. पुण्यातील वारजे परिसरातून त्याने 112 क्रमांकावर फोन लावून ही धमकी दिली होती. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या अनेकदा धमक्या आल्या आहेत. मात्र हा कॉल नागपूरमध्ये कंट्रोल रूमवर आल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय नेत्यांना धकमीचे फोन वारंवार येत असल्याचे दिसून येत आहे. याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दोन वेळा धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी बेळगाव येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

याआधी चार दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये तीन दहशतवादी आल्याची माहिती देणारा फोन कॉल मुंबई पोलीस  नियंत्रण कक्षात आला होता. दुबईवरुन शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा कॉलरने दावा केला होता. या फोननंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ सुरक्षेत वाढ केली होती.

मुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्यातील गारपीट आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करणारेत. धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी, धारुर आणि मोर्डा इथल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करतील. याठिकाणी अवकाळी पावसानं मोठं नुकसान झाले आहे. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत देखील मुख्यमंत्र्यांबरोबर असणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 71 गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसला आहे. पहिल्या दिवशी झालेल्या पंचनाम्यात 2 हजार 571 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री नेमकी किती मदत जाहीर करतात याकडे सर्व सर्वांचं लक्ष लागले आहे. 

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज व्हायचं कारणच नाही, असे स्पष्टीकरण अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल तर ऍक्शनमध्ये नाना पाटेकर असल्याची स्तुतीही त्यांनी केली. राज्य सरकारचा कार्यकाळ आता सात ते आठ महिने उरला आहे. तेव्हा आहे त्या स्थितीत सरकार चालवणं योग्य ठरेल असा सल्लाही बच्चू कडूंनी दिला आहे.