टोमॅटोचा दर भडकला, गाठली शंभरी

पावसानं पाठ फिरवल्याने भाज्यांच्या दरात वाढ होताना दिसतेय. रोजच्या भाज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोने तर किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे.

Updated: Jul 11, 2017, 11:54 AM IST
 टोमॅटोचा दर भडकला, गाठली शंभरी  title=

मुंबई : पावसानं पाठ फिरवल्याने भाज्यांच्या दरात वाढ होताना दिसतेय. रोजच्या भाज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोने तर किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे.

घाऊक बाजारात टोमॅटो किलोमागे ५०  रुपयांना विकला जातोय. वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आवक घटलीय. पावसाने  पाठ फिरवल्याने पुणे नाशिक आणि परराज्यातून येणाऱ्या भाज्यांमध्ये आणि टोमॅटोमध्येही घट झालीय.

प्रमुख भाज्यांचेही दर वाढलेयत. भेंडी वांगी, ढोबळी मिरची किलोला ६० ते ८० रुपये दरानं विकल्या जात आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी पन्नाशी पार केल्याचं चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे.