Local Fighting Video : महिलांमध्ये फ्री स्टाइल मारामारी, केस ओढून एकमेकांचे गाल सुजवले आणि...

Viral Video  : जर त्यात पिक टाइम असेल तर काही बोलायलाच नको. महिला डब्ब्यात तर कायम कशाना कशावरुन राडा होतं असतो. अशात लोकल ट्रेनमधील महिलांची  WWE चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आहेत.

Updated: Nov 14, 2022, 12:14 PM IST
Local Fighting Video : महिलांमध्ये फ्री स्टाइल मारामारी, केस ओढून एकमेकांचे गाल सुजवले आणि... title=
video Mumbai Local Train Woman Fighting Viral on Social Media nmp

Mumbai Local Train Woman Fighting Viral Video : मुंबईची लोकल (Mumbai Local) ही प्रत्येक मुंबईकरांची लाइफलाइन...मुंबई एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात लोकलचा वापर करतात. त्यामुळे मुंबईची जान लोकलमध्ये कायम तुफान गर्दी असते. अनेक वेळा त्यात चढण्यासाठीही जागा नसते. मग बसायला सीट मिळणं तर दूरचीच गोष्ट. जर त्यात पिक टाइम असेल तर काही बोलायलाच नको. महिला डब्ब्यात तर कायम कशाना कशावरुन राडा होतं असतो. अशात लोकल ट्रेनमधील महिलांची  WWE चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आहेत. (video Mumbai Local Train Woman Fighting Viral on Social Media nmp)

लोकलमध्ये महिलांचा राडा!

प्रवाशांमध्ये सीटवरून वाद होणे सामान्य झाले आहे. त्यानंतर महिलांमध्ये तुफान हाणामारी होतात. असे मारामारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. त्यातील पहिला व्हिडीओ आहे नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर असताना 3 महिलांमध्ये वाद झाला. महिला सीटवरून एकमेकांशी भांडत होत्या.हा व्हिडीओ @RoadsOfMumbai या ट्विटर हँडलने शेअर केला होता.

दे दणादणा हाणामारी

दुसरा प्रकार ट्रेनमध्ये सीटवरून महिलांनी चक्क एकमेकांचे केस, कपडे ओढले आणि दे दणादण मारामारी केली. ही घटना आहे ठाणे-पनवेल लोकल ट्रेनमधील. या भांडण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. महिलांमधील मारामारी थांबविण्यासाठी अखेर महिला पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. 

एका सीटवरुन एवढा राडा

लोकल ट्रेनमधील महिला डब्ब्यात घडणाऱ्या अनेक घटना कॅमेऱ्यात कैद होतं असतात. या महिलांसाठी लोकल ट्रेनमधील डब्बा अजून काही त्यांचं छोटंस घरं असतं. ते इथे अनेक गोष्टी करतात हळदीकुंकूपासून गरबा खेळण्यापर्यंत...पण याच लोकलच्या डब्ब्यात एका सीटवरुन होणारी बाचाबाची नंतर चक्क हाणामारीत रुपांतर होते. ही घटना मोबाईलमध्ये कैद होते आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल होते. हा व्हिडिओ हा तुर्भे लोकलमधील. 

महिलांमध्ये कधी आणि कुठे कशावरुन वाद होईल सांगा येतं नाही. पण एकमेकांचे केस उपटण्यापर्यंत कपडे फाडेपर्यंत हाणामारी करणे हे शोभतं का? महिलांचे मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्या वर व्हायरल होतं असतात. या व्हिडीओमुळे महिला प्रसिद्ध होतात पण ही प्रसिद्धी कुठल्या कामाची...त्यामुळे महिलांनी असं काही करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करायला हवा.