विधानपरिषदेसाठीच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध

विधानपरिषदच्या निवडणुकीसाठी ९ जुलै म्हणजे सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे.

Updated: Jul 8, 2018, 08:29 AM IST
विधानपरिषदेसाठीच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध title=

मुंबई: विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. ११ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण १२ अर्ज आल्याने ही निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपतर्फे पृथ्वीराज देशमुख हे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. 

आज निर्णय जाहीर..

दरम्यान (७ जुलै), आज होणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. विधानपरिषदच्या निवडणुकीसाठी ९ जुलै म्हणजे सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे महादेव जानकर यांना दिलासा मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

..तर निवडणूक अटळ

दरम्यान, आकरा जागा असताना त्यापेक्षा एकही अर्ज कायम राहिला आणि अर्जांची संख्या १२ किंवा त्यापेक्षा अधिक राहिली तर, निवडणूक अटळ आहे. पण, ही शक्यता अगदीच कमी आहे.