केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलं, रुग्णांचे हाल

मुंबईतील जेथे सर्वाधिक रुग्ण येतात त्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे रुग्णांसह कर्मचा-यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आतापर्यंत 30 रुग्णांना खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर हलवण्यात आलं आहे.

Updated: Aug 29, 2017, 06:01 PM IST
केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलं, रुग्णांचे हाल title=

मुंबई : मुंबईतील जेथे सर्वाधिक रुग्ण येतात त्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे रुग्णांसह कर्मचा-यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आतापर्यंत 30 रुग्णांना खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर हलवण्यात आलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मुंबापुरीला पुरतं झोडपून काढलंय. सकाळी साडे आठ ते साडे अकरा या तीन तासात पश्चिम उपनगरात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं सगळं जनजीवन ठप्प झालंय. सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पाहा व्हिडिओ