जेव्हा सुप्रिया सुळे आणि संजय राऊत एकत्र नाचतात ; पाहा व्हिडीओ

खरंतर संजय राऊत यांचं इतकं आनंदी होण्याचं कारण आहे त्यांची लेक.

Updated: Nov 28, 2021, 05:03 PM IST
जेव्हा सुप्रिया सुळे आणि संजय राऊत एकत्र नाचतात ; पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : संजय राऊत म्हटलं की डोळांसमोर उभ रहातं ते कडक आणि थोडं रागीट व्यक्तीमत्व. पण सध्या जो त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तो त्यांच्याबदल काही वेगळंच सांगतोय. जर तुम्हाला कोणी संजय राऊत हसतायत, नाचतायत, मजा करतायत असं सांगितले तरी देखील तुम्ही त्याची कल्पना करु शकणार नाही. कारण आपल्यापैकी फार कमी लोकांनी त्यांना असं नाचताना आणि इतकं आनंदी पाहिलं असेल. ज्यामुळेच त्यांचा हा व्हिडीओची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा होत आहे.

खरंतर संजय राऊत यांचं इतकं आनंदी होण्याचं कारण आहे त्यांची लेक. जिच्यामुळे ते इतके आनंदी आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहेत. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी २९ नोव्हेंबरला लग्न होणार आहे. संजय राऊत यानिमित्ताने राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत आणि आपल्या लेकीच्या लग्नासाठी निमंत्रण देत आहे.

दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत डान्स केला आहे. दोघांच्या डान्सचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवला आहे, ज्यामुळे तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे.