Zeel-Sony मर्जर : मर्जरनंतर तयार होणाऱ्या कंपनीच्या MD-CEO पदी पुनीत गोयंका

Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) आणि Sony Pictures Networks India एकत्र (Merger) येण्यावर एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Updated: Sep 22, 2021, 11:28 AM IST
 Zeel-Sony मर्जर : मर्जरनंतर तयार होणाऱ्या कंपनीच्या MD-CEO पदी पुनीत गोयंका  title=

मुंबई : Zee Entertainment Enterprises Limited (ZEEL) आणि Sony Pictures Networks India एकत्र (Merger) येण्यावर एक मोठी बातमी समोर आली आहे. ZEEL आणि Sony या दोन्ही दिग्गज कंपनीच्या एंटरटेनमेंट बोर्डने मर्जरची घोषणा केली आहे. झी एंटरटेनमेंटने बोर्डच्या मर्जरला सिद्धांतिक मंजुरी देखील दिली आहे. मर्जरनंतर सोनी सर्वात मोठा स्टेकहोल्डर होणार आहे. Sony ने Zeel च्या व्यवस्थापनाला कायम ठेवले आहे आणि विश्वास व्यक्त केला आहे. पुनीत गोयंका मर्जर नंतर बनणारी कंपनीचे MD आणि CEO पदी कायम राहतील. मर्जरनंतर ही नवी कंपनी भारताच्या शेअरबाजारात लिस्टेड असणार आहे.

झी बिझनेसचे मॅनेजिंग एडिटर अनिल सिंघवी यांच्या माहितीनुसार, नव्या कंपनीचं नेतृत्व पुनीत गोयंका यांच्या हाती असेल. पुनीत यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा ग्रोथ प्लान तयार होणार. Sony ने दिलेल्या माहितीनुसार पुनीत गोयंका पुढील ५ वर्षासाठी - मर्जरनंतर पुढील पाच वर्ष पुनीत गोयंका हे कंपनीचे MD आणि CEO असतील.

सोनी ग्रुपलला मर्ज झालेल्या कंपनीत मेजोरिटी डायरेक्टर नॉमिनेट करण्याचा देखील अधिकार असेल. झी एंटरटेनमेंटचे आर गोपालन यांनी म्हटलं आहे की, झीच्या कारभारात सतत ग्रोथ होत आहे. कंपनी बोर्डला मोठा विश्वास आहे की, या मर्जरनंतर झीला देखील याचा मोठा फायदा होणार आहे. दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने कंपनीला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर होल्डर्सला देखील याचा मोठा फायदा होणार आहे.

सध्याच्या स्थितीला में ZEEL च्या शेअरहोल्डर्सचा हिस्सा 61.25% आहे. $157.5 कोटी गुंतवणुकीनंतर या हिस्सेदारीत बदल होईल. के इन्वेस्टमेंट बाद इस हिस्सेदारी में बदलाव आ जाएगा. यानंतर ZEEL गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 47.07% च्या आसपास असेल. तर, सोनी पिक्चर्सच्या शेयरहोल्डर्सचा हिस्सा 52.93% टक्के असण्याचा अंदाज लावला जात आहे.