सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला भाविकांची गर्दी

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर लोटलाय. सप्तशृंगीच्या गडावर चैत्रोत्सव सुरु आहे. या उत्सवात आजच्या पौर्णिमेचं विशेष महत्त्व असतं.

Updated: Apr 7, 2012, 08:15 AM IST

www.24taas.com, नाशिक

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर लोटलाय. सप्तशृंगीच्या गडावर चैत्रोत्सव सुरु आहे. या उत्सवात आजच्या पौर्णिमेचं विशेष महत्त्व असतं.

जवळपास पाच लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. दर्शनासाठी रामनवमीपासून चैत्रपौर्णिमेपर्यंत गडावर भक्तांचा महासागर असतो. त्यातच सलग सुट्ट्या आल्यानं ही गर्दी वाढली आहे. परंपरेप्रमाणे याठिकाणी किर्तीध्वजाची मिरवणूक काढण्यात येऊन मध्यरात्री गडावर ध्वज फडकावण्यात आला.

बुलढाण्यातही चिखलीतल्या रेणुकादेवीच्या यात्रेला सुरूवात झाली आहे.यात्रेदरम्यान दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. नवसाला पावणारी देवी अशी रेणुकादेवीची ख्याती आहे. त्यामुळे नवस बोलण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं इथं दाखल झालेत. अनेक भाविक लोटांगण घालत देवीचं दर्शन घेत आहेत.