मला संपवण्यासाठी ३ जन्म घ्यावे लागतील- मुंडे

आज गोपीनाथ मुंडे यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच विरोधकांना चागंलच फैलावर घेतलं. 'मला संपवण्यासाठी विरोधकांना तीन जन्म घ्यावे लागतील' असा प्रतिटोलाच गोपीनाथ मुंडे यांनी हाणला आहे.

Updated: Jan 19, 2012, 07:16 PM IST

www.24taas.com, लातूर

 

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आणि तिथेच पंडितअण्णा यांनी प्रतिज्ञा केली की, 'मी गोपीनाथ मुंडे यांना मी राजकियदृष्ट्या संपवीन', तसचं धनंजय मुंडेंनी केलेली टीका या साऱ्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच विरोधकांना चागंलच फैलावर घेतलं. 'मला संपवण्यासाठी विरोधकांना तीन जन्म घ्यावे लागतील' असा प्रतिटोलाच गोपीनाथ मुंडे यांनी हाणला आहे.

 

अजितदादा पवार यांना देखील चांगलचं टीकेचं धनी केलं. 'पंडितअण्णा मुंडे जाण्याने कार्यकर्त्यांना दु:ख हे झालं आहेत', पण त्यामुळे भाजप कार्यकर्ते निराश झालेले नाहीत, असे गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.  तर पंडितअण्णा यांच्या टीकेला उत्तर देताना गोपीनाथ मुंडे यांनी पंडितअण्णांना चांगलेच सुनावले आहे, 'मी परिवार सोडून पळून गेलो नाही', 'राजकिय वाद कौटुंबिक पातळीवर नेण्याची गरज नाही'.

 

तसचं धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ज्या काकांनी याला सगळं काही दि्लं तरी त्यांच्यावर उलटणाऱ्यावर कोणाचे आणि कसे संस्कार आहेत हे दिसुन येतं, तर त्यामुळे धनंजयची चूक क्षमा करण्यायोग्य नाही घर सोडणारा चुकतो, घरात राहणार नाही. तर अजित पवारांनी घरफो़डी केली यांचा शाब्दिक अर्थ घेतल्याने हे गैरसमज झाला आहे. त्यामुळे अजित पवारांना अधिक अभ्यासाची गरज आहे. तसचं अजित पवारांनी पैसे देऊन लोक आणणं हा देखील आचारसंहितेचा भंग आहे.