नाशिक जिल्ह्यात मतदानाला सुरुवात

नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

Updated: Feb 7, 2012, 02:36 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

 

नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. जिल्ह्यात एकूण ३७७४ मतदान केंद्र असून त्यासाठी २४,९०४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील एकूण ८५ केंद्र संवेदनशील तर ६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्यात २२,७२,००० मतदार ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणार
आहेत.

 

[jwplayer mediaid="43235"]