लंडन ऑलिम्पिक : भारतीय बॉक्सर्स सज्ज

बीजिंगमध्ये विजेंदरनं मेडल मिळवल्यानंतर भारतीय बॉक्सर्सनी मोठी झेप घेतली आहे. मेरी कोमसह भारताचे सात बॉक्सर्स लंडनमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी आतूर आहे.

Updated: Jul 10, 2012, 08:46 PM IST

www.24taas.com, लंडन

 

बीजिंगमध्ये विजेंदरनं मेडल मिळवल्यानंतर भारतीय बॉक्सर्सनी मोठी झेप घेतली आहे. मेरी कोमसह भारताचे सात बॉक्सर्स लंडनमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी आतूर आहे.

 

लंडन ऑलिंपिकमध्ये भारताल शूटिंगशिवाय सर्वाधिक मेडल्सची संधी आहे ती बॉक्सिंगमध्ये...भारताचे तब्बल आठ बॉक्सर लंडन ऑलिंम्पिकमध्ये मेडल्सचा पंच लगावण्यासाठी सज्ज झालेय.

 

देवेंद्रो सिंग, शिव थापा, जय भगवान,मनोज कुमार,विकास कुष्णन,विजेंदर सिंग आणि सुमीत सांगवान हे सात बॉक्सर तर मेरीकोम महिला बॉक्सिंगमध्ये भारताचा तिरंगा लंडनमध्ये फडकवण्यास आतूर आहेत.

 

बीजिंग ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच बॉक्सर्सचा दम दिसला...अखिल कुमार आणि जितेंदर यांनी उपात्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली तर विजेंदरनं मात्र ब्रान्झ मेडलीची कमाई करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. आता लंडनमध्येही भारताला सर्वाधिक अपेक्षा असणार ते तिस-यांदा ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणा-या विजेंदरकडूनच

 

लंडन ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या वुमेन्स बॉक्सिंगमध्ये भारतही मेडल्सचा प्रबळ दावेदार असणार...पाच वेळा जगज्जेते ठरलेल्या मेरी कोम गोल्डन पंच लगावण्यास सज्ज आहे.

 

ऑलिंपिक बॉक्सिंगमध्ये विजेंदरनं मेडल मिळवत इतिहास घडवला...आता लंडनमध्ये तीन ते चार मेडल्सला पंच लगावत मोठी झेप घेण्याची संधी भारतीय बॉक्सर्सला मिळाली आहे.