सायना नेहवालला कांस्य पदक

पुन्हा एकदा सायनाला नशिबाने साथ दिली. लंडन ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारताला सायना नेहवालने कांस्य पदक मिळवून दिले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात ऑलिम्पिकचे तीन पदक आले आहेत.

Updated: Aug 4, 2012, 10:40 PM IST

www.24taas.com, लंडन

 

पुन्हा एकदा सायनाला नशिबाने साथ दिली. लंडन ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारताला सायना नेहवालने कांस्य पदक मिळवून दिले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात ऑलिम्पिकचे तीन पदक आले आहेत.

 

बॅडमिंटनमध्ये सुपर सायनाचा मुकाबला चीनच्या वँग शिनच्या विरोधात होता.  सायनाने पहिला सेट गमावला होता.  मात्र दुस-या सेटमध्ये तिने कमबॅक करत वँग शिनला चांगली लढत दिली.  सायनाच्या या विजयामुळे भारताच्या खात्यात तिस-या ऑलिम्पिक मेडलची नोंद झाली आहे. पहिल्या गेममध्ये 21-18 ने पिछाडीवर पडल्यानंतर सेकंड गेममध्ये चीनच्या वँग झीनला पायाच्या दुखापतीने सतावलं आणि अखेर तीने पुढे न खेळण्याचा निर्णय घेत मॅच सायनाला बहाल केली.

 

भारताच्या विजय कुमारनं २५ मीटर एअर पिस्तुलच्या अंतीम फेरीत शानदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधून दुसरे स्थान पटकावले.  तर गगन नारंगनंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारा विजय कुमार हा दुसरा भारतीय ठरला आहे.

 

सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले आहे.  तिच्या या यशाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. हरियाणा सरकारने सायनाला एक कोटीचे बक्षिस जाहीर केले आहे.