'सी यू इन गोल्ड कोस्ट इन २०१८’

ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड प्रांतातल्या गोल्डकोस्ट शहराने २०१८ सालच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनाचे यजमानपद पटकावलं आहे. श्रीलंकेतील हंबनतोटाही यजमानपदाच्या स्पर्धेत होतं. सेंट किटस आणि नेविस या कॅरेबियन राष्ट्रात भरलेल्या जनरल असेंब्लीत झालेल्या मतदानात गोल्डकोस्टने बाजी मारली आणि फेडरेशने 'सी यू इन गोल्ड कोस्ट इन २०१८’ असं ट्विटरवर ट्विट केलं.

Updated: Nov 12, 2011, 11:27 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड प्रांतातल्या गोल्डकोस्ट शहराने २०१८ सालच्या  कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनाचे यजमानपद पटकावलं आहे. श्रीलंकेतील हंबनतोटाही यजमानपदाच्या स्पर्धेत होतं. सेंट किटस आणि नेविस या कॅरेबियन राष्ट्रात भरलेल्या जनरल असेंब्लीत झालेल्या मतदानात गोल्डकोस्टने बाजी मारली आणि फेडरेशने 'सी यू इन गोल्ड कोस्ट इन २०१८’ असं ट्विटरवर ट्विट केलं.

गोल्ड कोस्ट हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे आणि दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक तिथे गर्दी करतात. गोल्ड कोस्ट हे नवी दिल्लीहून सर्वस्वी वेगळं शहर आहे. नवी दिल्ली इथे मागच्या वर्षी संपन्न झालेलेल कॉमनवेल्थ गेम्स आयोजनातल्या ढिसाळपणामुळे आणि त्यानंतर भ्रष्टाचाराच्या खटल्यांमुळे चर्चे राहिलं.

दिल्लीतल्या कॉमनवेल्थ आयोजनाचा खर्च तिपट्टीने वाढला आणि तो ६ बिलियन अमेरिकन डॉलर जाऊन पोहचला. कॉमनवेल्थ गेम्सचे पाचव्या वेळा आयोजन करण्याचा बहुमान मिळवणारं ऑस्ट्रेलिया हे एकमेव राष्ट्र आहे.

याआधी ऑस्ट्रेलिया मेलबर्नमध्ये २००६ साली, ब्रिसबेनमध्ये १९८२, पर्थमध्ये १९६२ आणि सिडनीमध्ये १९३८ साली कॉमनवेल्थ गेम्स आयोजीत करण्यात आले होते. कॉमनवेल्थ गेम्समुळे गोल्ड कोस्टच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल असं ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि क्रिडा मंत्री मार्क अरबिब म्हणाले.

Tags: