www.24taas.com, मुंबई
काल महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तसचं पत्रकार परिषदेत दावा देखील केला की 'मुंबईचा महापौर हा मीच ठरवेन'. त्यांच्या वक्तव्यावर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी राज यांना उत्तर देत, सांगितले की मुंबईचा महापौर राज ठाकरे नाही तर, आरपीआय ठरवेल.
मुंबईचा महापौर राज ठाकरे नव्हे तर आरपीआय़ ठरवेल असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबईचा महापौर मनसे ठरवील असा दावा राज ठाकरेंनी केला होता, त्यावर आठवलेंनी राज यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज ठाकरेंच्या मनसेची जादू ओसरत चालल्याचं आठवले म्हणाले. येणा ऱ्य़ा निवडणुकीत मनसेला मतदार त्यांची जागा दाखवून देतील असंही राज ठाकरे म्हणाले.
मुंबईवर महायुतीचाच भगवा निळा फडकेल असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसचं आठवले यांना विश्वास आहे की त्यांना मिळालेल्या एकूण जागांपैकी जवळजवळ १४ ते १५ जागांवर आरपीआय उमेदवार निवडून येतील.
[jwplayer mediaid="37793"]