राज यांना शिवाजी पार्क सभेची परवानगी नाही

शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे.

Updated: Feb 3, 2012, 08:43 PM IST

www.24taas.com,मुंबई

शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे.

 

कितीही केसेस टाका, पण शिवाजी पार्कजवळ सभा होणारच, शिवाजी पार्कवर सभा घेऊ दिली नाही तर रस्त्यावर सभा घेऊ, लोकशाहीत कोणालाही कुठेही सभा घेण्याचा अधिकार असल्याचेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट करत बंडाचा पवित्रा घेतला आहे.

 

मनसेला १३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर मनसेला सभा घ्यायची होती. पण हा परिसर सायलेन्स झोन असल्यानं मुंबई हायकोर्टानं मनसेची याचिका फेटाळलीय.

महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी १३ फेब्रुवारी रोजी शिवाजीपार्क मैदान मिळावे, अशी याचिका मनसेने दाखल केली होती. येथे प्रचारसभेसाठी परवानगी देण्यास विलंब करत असल्यामुळे मनसेने मुंबई महापालिकेविरोधात कोर्टात दाद मागितली होती. सभेच्या परवानगीसाठी मनपाकडे तब्बल ३५ अर्ज केले. मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही, असे मनसेकडून सांगण्यात आले होते. मनसेच्या कृतीसंदर्भात प्रतिक्रिया मागितली असता,  मनपा प्रशासनाने नियमांना बांधिल असल्यामुळेच शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी दिली नसल्याचे सांगितले होते .