ड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच - ओबामा

पाकिस्तानमध्ये तालिबान दहशतवात वाढत आहे. हा दहशतवाद संपविण्यासाठी कठोर पावलं उलण्यात आली आहेत. त्यामुळे तालिबान आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य बनवून करण्यात येणारे ड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच करण्यात येत असल्याचे, आज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.

Updated: Jan 31, 2012, 03:28 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

पाकिस्तानमध्ये तालिबान दहशतवात वाढत आहे. हा दहशतवाद संपविण्यासाठी कठोर पावलं उलण्यात आली आहेत. त्यामुळे तालिबान आणि अल कायदाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य बनवून करण्यात येणारे ड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच करण्यात येत असल्याचे, आज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.

पाकिस्तानमधील आदिवासी भागात होत असलेले ड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच करण्यात येत आहेत. अल कायदा आणि त्यांच्या संलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य करूनच हे हल्ले करण्यात आले आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींनाच लक्ष्य करण्यात येते. मात्र, कारवाई करताना खूप सावधानता बाळगण्यात येते, असे ड्रोन हल्ल्यांविषयी गुगल प्लस आणि यू ट्युबवरील युजर्सशी गप्पा मारताना ओबामा यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अमेरिकेने सुमारे ६४ ड्रोन हल्ले केले आहेत. तर गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेकडून पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये एक हजार ७१५ जण ठार झाले आहेत. अमेरिकची व्यवस्था बिघडविणारे, अमेरिकेला लक्ष्य करणारे आणि अमेरिकेसाठी धोका असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येते, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. विशेषत: अफगणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर जास्त कारवाया करण्यात येत असल्याचे बराक ओबामा यांनी सांगितले.