जेवणापूर्वी मंत्र का म्हणावेत?

Last Updated: Tuesday, February 7, 2012 - 17:52

www.24taas.com, मुंबई

 

अन्न मनुष्याला जगवतं, जगण्यची ऊर्जा देतं. आपलं शरीर जगतं तेच अन्नावर. मात्र हेच अन्न चांगलं नसेल, तर त्याचा आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. शरीरावर वाईट प्रभाव पडू नये, यासाठी कुठल्या प्रकारचं अन्न कशा पद्धतीने जेवावं, याचे काहे संकेत पाळावे लागतात.

 

शास्त्र म्हणतं, अन्न हे पूर्णब्रह्म. म्हणूनच जेवणापूर्वी अन्नाला नमस्कार करावा. त्यानंतर अन्नदेवतेची मनापासून प्रार्थना करावी. आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून आपल्याला चांगलं जेवण मिळवून दिल्याबद्दल, जगवल्याबद्दल आभार मानावेत. याचबरोबर एखाद्या दिव्य मंत्राचा जप करावा.  अनेक दिव्य मंत्र शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. पण, त्याव्यतिरिक्त ऊँ नम: शिवाय, गायत्री मंत्र इ. सोपे मंत्र म्हणूनही जेवण जेवल्यास त्याचा योग्य आणि सकारात्मक परिणाम शरीरावर होतो आणि देवांचे आशीर्वादही प्राप्त होतात.

 

पोटात भुकेने होत असलेली आग म्हणजे पेटलेला यज्ञ मानला जातो. या यज्ञात अन्नरुपी समिधा अर्पण करताना मंत्र म्हणणं म्हणून आवश्यक असतं.  मंत्राभारलं अन्न हे शरीराला अधिक पवित्र ऊर्जा मिळवून देतं आणि वाईट शक्तींना दूर ठेवतं.

First Published: Tuesday, February 7, 2012 - 17:52
comments powered by Disqus