साडेसाती सुरू आहे, तर करा हे उपाय

Last Updated: Tuesday, January 15, 2013 - 08:20

www.24taas.com
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार? यावरच काही उपाय देखील आहेत.
शनिची प्रतिकूल अवस्था आपल्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे.
शनि दोष दूर करण्यासाठी उपाय:
-तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.
-पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावावा.
-हनुमान व सूर्याची आराधना करावी.
-मांस- मद्य यांचे सेवन करू नये.
-दीन दुबळ्यांना मदत करावी.
-काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

First Published: Tuesday, January 15, 2013 - 08:18
comments powered by Disqus