शुक्रवारच्या दिवशी करा यापैकी एक उपाय

हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस लक्ष्मीमातेचा दिवस मानला जातो. या दिवशी काहीजण व्रतही ठेवतात. ज्यामुळे लक्ष्मीमातेचा वरदहस्त कायम त्या व्यक्तीवर राहतो. 

Updated: Dec 16, 2016, 09:36 AM IST
शुक्रवारच्या दिवशी करा यापैकी एक उपाय  title=

मुंबई : हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस लक्ष्मीमातेचा दिवस मानला जातो. या दिवशी काहीजण व्रतही ठेवतात. ज्यामुळे लक्ष्मीमातेचा वरदहस्त कायम त्या व्यक्तीवर राहतो. 

पैसे मिळवण्यासाठी आपण बरेच कष्ट घेतो. पैसा हा नेहमी सत्याच्याच मार्गाने मिळवावा. असत्याच्या आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कधीच टिकत नाही. शास्त्रातही धनप्राप्तीसाठी सत्याचा मार्ग अवलंबण्याचा उपदेश देण्यात आलाय. धनप्राप्तीसाठी तसेच लक्ष्मीमातेची कृपा कायम राहण्यासाठी काही उपाय आहेत ते घ्या जाणून..

1. घरातील स्वच्छतेकडे नेहमी लक्ष द्या. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नेहमी वास करते. 

2. सायंकाळच्या वेळेस कधीही घरात झाडू मारु नका. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते. ..

3. शुक्रवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला सफेद वस्तू म्हणजेच पीठ, तांदूळ, सफेद रंगाचे कपडे दान केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.