... करा स्वत:च्या घरात प्रवेश!

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, July 16, 2013 - 08:07

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा कुणाला नसते. ही प्रत्येकाच्या मनामनात लपलेली इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरतूनच परतून जाते. पण, धर्मशास्त्रात असे काही उपाय सांगितले गेले आहेत ज्यामुळे भाड्यांच्या घरातून आपली सुटका होऊ शकते. आपण आपल्या स्वत:च्या घरात पाऊल टाकू शकतो.
पाहुयात काय आहेत हे उपाय...
- जुन्या घरात वास्तूदोष आहे का? हे तपासून घ्या. भाड्याच्या घरातील वास्तूदोष तुम्ही सुधारू शकणार नाही मात्र नवीन भाड्याचं घर नक्कीच शोधू शकता.
- घराचा उत्तर-पूर्व भाग नेहमी रिकामा ठेवावा. या ठिकाणी सामान ठेऊन घरात अडगळ निर्माण करू नये. त्यामुळे आर्थिक अडचणी नेहमी सतावत राहतील.
- घरातील जड वस्तू किंवा अनावश्यक सामान घरातील दक्षिण-पश्चिम भागामध्ये ठेवावे. इतर ठिकाणी जड सामान किंवा वस्तू ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.
- बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील पाण्याचा नळ उत्तर-पूर्व दिशेकडून घ्या. त्याचबरोबर बाथरूम, स्वयंपाकघर, इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकनार नाही याची काळजी घ्यावी.
- बेडरूममध्ये पलंगाचे डोके दक्षिण दिशेकडे असावे.

- झोपताना तुमचे डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तर दिशेला असावेत. हे शक्य नसेल तर पश्चिम दिशेला डोके करून झोपावे. अशाप्रकारे झोपल्यास विविध आजारांपासून बचाव होईल.
- जेवताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे. हा उपाय केल्यास जेवणाची पूर्ण शक्ती प्राप्त होते आणि वास्तुदोष नष्ट होतो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013 - 08:07
comments powered by Disqus