देवघरात किती देव असावेत?

पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तेथून त्या ठिकाणाच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात आणि नंतर पूजेत ठेवतात.

Updated: Feb 2, 2015, 03:59 PM IST
देवघरात किती देव असावेत?  title=

मुंबई : पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तेथून त्या ठिकाणाच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात आणि नंतर पूजेत ठेवतात.

या मागची त्यांची भावना कितीही चांगली असली तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची पूजा करणेही कठीण होऊन बसते.  

हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती वा तसबिरींची संख्या वाढवू नये.

कुलदेवतांचे फोटो वा मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्ट देवतांची तसेच एखाद्या संतपुरुषाची तसबीर वा मूर्तीठेवावी. गणपतीची मूर्ती मात्र आवश्यक असावी 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.