रस्त्यावर पैसे सापडले तर काय करावे

रस्त्यावर चालत असतांना अनेकदा नाणे किंवा नोट मिळणे ही सामान्य गोष्ट आहे. साहजिकच अनेक जण ते पैसे उचलून खिशात ठेवतात. काही जण ती लक्ष्मी समजून जपून ठेवतात तर काही जण लगेच खर्च करुन टाकतात.

Updated: Mar 11, 2016, 10:09 AM IST
रस्त्यावर पैसे सापडले तर काय करावे title=

मुंबई : रस्त्यावर चालत असतांना अनेकदा नाणे किंवा नोट मिळणे ही सामान्य गोष्ट आहे. साहजिकच अनेक जण ते पैसे उचलून खिशात ठेवतात. काही जण ती लक्ष्मी समजून जपून ठेवतात तर काही जण लगेच खर्च करुन टाकतात.

रस्त्यावर सापडलेल्या पैशांबाबत जोतिष शास्त्र काय सांगतं तुम्हाला माहित आहे. रस्त्यावर पडलेले पैसे उचलून घ्यावे. ते पैसे कोणाचे आहेत हे जर माहित नसेल तर एखाद्या गरजू व्यक्तीस आपण ते पैसे दिले पाहिजे. 

ज्याचे पैसे हरवले त्याचे मन दु:खी होऊ शकते म्हणजेच त्या पैशासोबत त्या व्यक्तीचे दु:खही चिकटलेलं असतं. हा पैसा आपण वापरल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची अधिक शक्यता असते.

रस्त्यावर सापडलेले पैसे ज्याचे आहेत ती व्यक्ती शोधूनही सापडली नाही तर ती रक्कम गरजू व्यक्तीस किंवा सामाजिक, धार्मिक कार्य करणार-या संस्थेस गुप्त दान द्यावे. असे केल्याने अक्षय पुण्यप्राप्ती होते.