जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्ती तुमची जोडी अनुकूल?

 तुम्ही तुमच्या राशी लक्षात घेऊन त्याला अनूकूल अशा राशीचा जीवनसाथीची निवड करणार असाल तर तुमची जोडी चांगली जमेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. 

Updated: Nov 13, 2015, 04:28 PM IST
जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्ती तुमची जोडी अनुकूल?  title=

मुंबई :  तुम्ही तुमच्या राशी लक्षात घेऊन त्याला अनूकूल अशा राशीचा जीवनसाथीची निवड करणार असाल तर तुमची जोडी चांगली जमेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. 

जीवन साथीची निवड करताना राशीवर लक्ष ठेवणे योग्य असते. गणेश ज्योतिष शास्त्रनुसार कोणत्या व्यक्तीचे संबंध त्या व्यक्तीच्या राशीवर अवलंबून असते. ज्योतिषशास्त्रात बारा राशींचा उल्लेख आहे. 

जाणून घ्या ज्योतिषनुसार कोणत्या राशीच्या जोड्या जुळून येतात आणि वैवाहिक जीवन सुखकर होते. 

मेष आणि सिंह - वैवाहिक जीवनासाठी ही सर्वात परफेक्ट जोडी आहे. गणेश ज्योतिषानुसार अशा राशींवाल्यांच्या जोडीबद्दल चित्रपटात किंवा पुस्तकात तुम्ही वाचतात. या दोन्ही राशीतील लोक समझदार असतात. त्यांची आपसातील ट्युनिंग खूप चांगलं असते

वृषभ आणि कर्क - गणेश ज्योतिषानुसार या दोन राशींचा संबंध आदर्श मानला जातो. या राशीतील जोडीदार एकमेकांसाठी जगतात. दोघांमध्ये खूप प्रेम असते. 

मिथून आणि कुंभ - गणेश ज्योतिषानुसार या दोन जोड्यांमध्ये जीवन शानदार आणि रोमांचक असते. हे दोघे एकमेकांना खूप समजून घेतात. दोघांमध्ये एकमेकांबद्दल ट्यूनिंग खूप जबरदस्त असते. त्यामुळे ताळमेळ खूप बसतो. 

कन्या आणि वृश्चिक - गणेश ज्योतिषानुसार वैवाहिक जीवनातील ही जोडी खूप मजेदारअसते. जीवनात मजामस्करी असते आणि सदाबहार जीवन असते. दोघेही एकमेकांना खुश ठेवतात आणि खूश पाहणे पसंत करतात. त्यामुळे ही जोडी परफेक्ट असते. 

तूळ आणि धनू - या राशीचे लोक सामाजिकदृष्टया खूप सक्रीय असतात. यांचे सोशल सर्कल मोठा असतो. यांचे अनेक दोस्त मंडळी असतात. यांचे वैवाहिक जीवन रोमान्स,त उत्साह आणि एकमेकांना समजून घेणारे असते. दोघे एकमेकावर जीव ओवाळून टाकतात. ही एक आदर्श जोडी असते. 

मीन आणि कन्या - या राशीच्या जोड्यांचे जीवन खूप आनंददायी असते. गणेशनुसार हे दोघे एकमेकांना देणार खूप वेळ देतात. नेहमी प्रेम करतात. तसेच सकारात्मक उर्जा त्यांच्यात असते. आपल्या पार्टनरसाठी आनंददायी जीवन जगतात. 

खाली एक चार्ट दिला आहे त्यानुसार तुमची लव लाइफ चेक करा... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.