मंदिरात `घंटानाद` कशासाठी?

आपण कधीही मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम घंटा वाजवतो. यामागे शास्त्र आहे. घंटा वाजवून आपण देवाचं आपल्याकडे लक्ष तर वेधून घेतोच, पण घंटा वाजवल्यामुळे वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण होतात. या कंपनांचा आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 25, 2012, 09:15 PM IST

www.24taas.com, मुंबई
आपण कधीही मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम घंटा वाजवतो. यामागे शास्त्र आहे. घंटा वाजवून आपण देवाचं आपल्याकडे लक्ष तर वेधून घेतोच, पण घंटा वाजवल्यामुळे वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण होतात. या कंपनांचा आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या आसपासच्या नकारात्मक शक्ती दुर्बल होऊन नष्ट होतात. आपली एकाग्रता वाढवतात.
मंदिरात घंटा वाजवून आपण आपल्यालाच भानावर आणत असतो. घंटानाद केल्यामुळे आपल्या मनात चालू असलेल्या इतर विचारांना विराम मिळतो आणि इतर विचार थांबतात. समोरील देवाच्या मूर्तीवर आपण चित्त एकाग्र करू शकतो. ज्या मंदिरात घंटानाद सतत चालू राहातो, त्या देवस्थान जागृत देवस्थान बनते. कारण येथील देव घंटानादामुळे सतत जागा राहातो.
प्राचीन काळापासून घंटा वाजवण्याची पद्धत रुढ आहे. घरातही देवांची पूजा करताना आपण घंटानाद करतो. पूजेमध्येही घंटेला विशेष स्थान असतं. घंटा वाजवल्याने पापक्षालन होत अशल्याचं पुराणांमध्ये सांगितलं आहे. घंटा वाजवल्या जो ध्वनी येतो, तो ऊँकाराच्या नादाशी साधर्म्य साधणारा आहे. सृष्टी निर्माण होताना हाच नाद घुमला होता. त्याच ध्वनीचं घंटानाद हा रुपक मानलं जातं