जपमाळेत १०८ मणी का असतात?

 कारण ग्रह नऊ आहेत राशी बारा म्हणजे ९ x १२ = १०८ होतात त्या प्रकारे २७ नक्षत्र आहेत व प्रत्येक नक्षत्राचे चार चरण आहेत. म्हणजे २७ x ४ = १०८ त्यामुळे जप माळेत १०८ मणी असतात. 

Updated: Feb 18, 2015, 08:06 PM IST
जपमाळेत १०८ मणी का असतात?  title=

मुंबई :  कारण ग्रह नऊ आहेत राशी बारा म्हणजे ९ x १२ = १०८ होतात त्या प्रकारे २७ नक्षत्र आहेत व प्रत्येक नक्षत्राचे चार चरण आहेत. म्हणजे २७ x ४ = १०८ त्यामुळे जप माळेत १०८ मणी असतात. 

नामजप करताना जपमाळेला महत्त्व, तसेच जपमाळेतील मण्यांच्या संख्येला सुद्धा महत्त्व आहे. सामान्यपणे जपमाळेत १०८ मणी असतात. महाभारतात भगवान विष्णूची आणि शंकराची १०८ नावे आली आहेत. १०८ ही संख्या तितक्या संख्येचे मनोविकार, तितक्या ज्ञानभूमिकेवरच्या देवता आणि तितक्या संख्येनेच विद्या असतात. तसेच एकूण २७ नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात. त्यामुळे सुद्धा जपमाळेत १०८ मणी असतात. अध्यात्मामध्ये ९ या संख्येला ब्रह्माचे वाचक मानले आहे. या संख्येच्या १२ पट जप व्हावा. कारण पत्रिकेतील राशिस्थाने बारा, महिने बारा आणि एका तपाचा कालावधी पण बारा. त्यामुळे सुद्धा १०८ संख्या ठरविली आहे.

संप्रदायाप्रमाणे वेगळी मण्यांची संख्या
 
सर्वसामान्य जपमाळेत १०८ संख्या गृहीत धरली असली तरी मण्यांची संख्या संप्रदायपरत्वे आणि कामनापरत्वे भिन्न भिन्न असते. शैव ३२ मण्यांची, तर वैष्णव १०८ मण्यांची माळ वापरतात. धनलाभासाठी ३०० मण्यांची, पुष्टीसाठी २७ मण्यांची व सर्वार्थासिद्धीसाठी १०८ मण्यांची माळ वापरावी, असे शास्त्राने सांगितले आहे.
 
साधारणपणे प्रत्येकच धर्म आणि संप्रदायामध्ये मंत्रजप आणि त्यासाठी जपमाळ यांचा वापर केला जातो. बौद्ध धर्मात जपमाळ ही अवलोकितेश्‍वराची खूण मानली जाते. जैन लोक ‘णमोकार’ मंत्राचा जप करण्यासाठी चंदनी माळ घेतात. शीख लोकांची जपमाळ लोकरीच्या धाग्याची असते.

धर्मानुसार मणीची वेगळी संख्या 
तसेच ते मण्यांची माळ पण वापरतात. मुसलमानांच्या जपमाळेत ९९ मणी असतात. कारण अल्लाची ९९ नावे आहेत. पण रोजच्या व्यवहारासाठी ते ३३ मण्यांची माळ वापरतात. रोमन कॅथॉलिकांच्या जपमाळेत १५० मणी असतात आणि माळेच्या मध्यभागी क्रूसासारखा लोलक असतो.
 
हिंदू धर्मात अनेक देव-देवतांच्या हातांमध्ये जपमाळ असते. ती कालगणनेचे प्रतीक मानली जाते. जपमाळेतील एकेक मणी पुढे ओढला जातो तसा काळातील सुद्धा एकेक दिवस पुढे ओढला जातो. आयुष्यातील एकेक क्षण नष्ट होत असतो त्यामुळे प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.