कसा असतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुमचे प्रभावी सद्गुण म्हणजे तुमच्या अंगी असलेला लढवय्या बाणा कोण्त्याही प्रसंगात न डगमगता संघर्षात्मक टक्कर देण्याची ताकत असते.

Updated: May 15, 2013, 03:37 PM IST

तुमचे प्रभावी सद्गुण म्हणजे तुमच्या अंगी असलेला लढवय्या बाणा कोण्त्याही प्रसंगात न डगमगता संघर्षात्मक टक्कर देण्याची ताकत असते. ती तुमच्याकडून घेण्यासारखी असते. तुमच्या मनातील सुखदुःखाच्या भावना आणि हाती घेतलेले कार्य यामध्ये सतत संघर्ष सुरू असतो.
इच्छाशक्ती प्रबळ असते. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत घाईगडबडीत तुम्ही कधीच काम करत नाहीत. तुम्ही सामर्थ्यशील असल्यामुळे कोणाच्या ताब्यात राहत नाही. तुमच्या या स्वभावामुळे तुमच्या घराला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुमचा पहाडासारखा आधार असतो हे नक्की.
अहो तुमची शारीरिक आणखी मानसिक शक्ती इतरांना लाजवेल अशी असते. कठीण प्रसंगात हार न मानणे. नाराज न होणे. हेच सद्गुण तुमचे आयुष्य तारायला संकटाना मारायला पुरेसे असते. म्हणूनच तुमच्या धाडसाचा इतरांना हेवा वाटतो.
पहिला हार्ट अटॅक येऊन गेल्यावर अजून दोन शिल्लक आहेत, तोपर्यंत इकडची दुनिया तिकडे करून ठेवीन असे म्हणणारे तुम्ही दुःखात खचून न जाता मरणालाही हसत सामोरे जाण्याची धडाडी ठेवतात.
इतरांवरती टीका करणे, राग आवरणे, दुसऱ्यांचे मन जाणून घेणे, तडजोड हा प्रकार तुमच्याकडे थोडा कमीच. स्वतः बद्दल आत्मविश्वास त्यामुळे काय होते इतरांचे दोष दिसतात. त्यामुळे तुमची एकाकी होण्याची दाट शक्यता असते.

पंडीत मानसी, ज्योतिष विशारद
+91 74987 77221
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.