२०१० पासूनच श्रीशांत बेटींगच्या धंद्यात!

श्रीशांत याचं नावं स्पॉट फिक्सिंगमध्ये आल्यानंतर आता आणि एक नवीन खुलासा झालाय. २०१० सालापासूनचं श्रीशांत या बेटींगच्या धंद्यात असल्याचं त्याच्या कंपनीच्या निगमन प्रमाणापत्राच्या अर्जावरुन स्पष्ट झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 23, 2013, 11:31 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
श्रीशांत याचं नावं स्पॉट फिक्सिंगमध्ये आल्यानंतर आता आणि एक नवीन खुलासा झालाय. २०१० सालापासूनचं श्रीशांत या बेटींगच्या धंद्यात असल्याचं त्याच्या कंपनीच्या निगमन प्रमाणापत्राच्या अर्जावरुन स्पष्ट झालंय.
श्रीशांतच्या ‘एस ३६ स्पोर्टस अॅन्ड एन्टरटन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीनं कंपनी अॅक्ट १९५६ खाली त्याची कंपनी काय काय करणार आहे, याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार त्यानं आपल्या घोषणापत्रात त्याची एस ३६ ही कंपनी राज्यपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत सट्टा लावणार असल्याची माहिती त्यात दिली होती. ते घोषणापत्रही ‘झी मीडिया’च्या हाती लागलंय.

आयपीएल फिक्सिंग : श्रीशांतपासून बीसीसीआयच्या दाराशी...
> आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा १४ मे रोजी पर्दाफाश झाला आणि आयपीएल पुन्हा एकदा वादात सापडलं. मॅच फिक्सिंगप्रकरणी आत्तापर्यंत सहा खेळाडूंना अटक करण्यात आलीय.
> राजस्थान रॉयलचे श्रीसंत, अजित चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांना १५ मे रोजी अटक झाली.
> त्यानंतर काही रणजीपटूंचेही फिक्सिंग कनेक्शन समोर आले. यात रणजीपटू आणि राजस्थान रॉयलचाच माजी खेळाडू अमित सिंग, बाबूराव यादव आणि मनीष गुड्डेवार यांचा समावेश आहे.
> याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ९ तर दिल्ली पोलिसांनी ११ बुकींना अटक केलीय.
> मंगळवारी मॅच फिक्सिंगचे बॉलिवूड कनेक्शन पुढं आलं. अभिनेता बिंदू दारा सिंग याचे बुकीशीं संबंध असून त्यांना पळून जाण्यास मदत केल्याचं उघड झाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.
> टीम इंडियाचा कॅप्टन धोनीची पत्नी साक्षीसोबतही त्याचे फोटो झळकल्यानं साक्षीसोबतही त्याचे संबंध आहेत का? याची चर्चा सुरू झालीय.
> विशेष म्हणजे बिंदूचे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ अय्यपन याच्याशी जवळीक असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं या प्रकरणानंतर आठव्या दिवशी मॅच फिक्सिंग बीसीसीआयच्या दाराशी येऊन ठेपल्याचं दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.