समीर धर्माधिकारीच्या घरी हाताने घडविला जातो बाप्पा

सध्या छोट्या पडद्यावर हिंदी मालिकेत गाजत असलेल्या 'अशोका' या हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता समीर धर्माधिकारी हा दरवर्षी स्वतःच्या हाताने गणपती तयार करतो. 

Updated: Sep 15, 2015, 06:37 PM IST
समीर धर्माधिकारीच्या घरी हाताने घडविला जातो बाप्पा title=

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर हिंदी मालिकेत गाजत असलेल्या 'अशोका' या हिंदी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता समीर धर्माधिकारी हा दरवर्षी स्वतःच्या हाताने गणपती तयार करतो. 

यंदा त्याला व्यस्त शेड्यूलमुळे गणपती तयार करता आला नाही. पण त्याच्या पत्नीने ही धुरा सांभाळली आहे. दोघं मिळून गणूू बाप्पाची मूर्ती तयार करतात. अपर्णा धर्माधिकारी या गेल्या १२ वर्षांपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात. त्यांनी यंदाही सुंदर गणपतीची मूर्ती तयार केली आहे. 

समीरच्या घरी सर्व कलाकार आहेत. त्याच्या दोन्ही मुली पार्वती आणि सरस्वतीही यांनी छोटे बाप्पा घडविले आहेत. त्याची पत्नी अपर्णा ही स्वतः प्रोफेशनल कॅमेरावुमन आहेत. 

पाहू या हा खास व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.