दीड दिवसाच्या बाप्पाचं थाटात विसर्जन

दीड दिवसांच्या गणपतींना आज वाजतगाजत निरोप देण्यात आलाय. मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर आणि तलावांवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 10, 2013, 10:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दीड दिवसांच्या गणपतींना आज वाजतगाजत निरोप देण्यात आलाय. मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर आणि तलावांवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती.
पुढच्या वर्षी लवकर या, अशी विनवणी करत गणरायाला निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनानंतर पाण्यात प्रदूषण होऊ नये, यासाठी बऱ्याच ठिकाणी कृत्रिम तलावही तयार करण्यात आले होते.

दीड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनासाठी जुहूच्या समद्रकिनाऱ्यावर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. ज्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायाचे काल स्वागत केले त्याच उत्साहात आज दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आलं.
गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाला एका भक्तानं सोन पावलं अर्पण केली आहेत. ही पावलं तब्बल सात किलो वजनाची असल्याचं सांगण्यात आलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.